नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून घटस्थापना होते आणि प्रारंभ होतो तो नवरात्रीच्या जागरणाला.. हीच सुरुवात असते ती गरबा-दांडियाच्या जल्लोषाची. पूर्वीचा धार्मिक स्वरूप असलेला रासगरबा, दांडिया आता इतिहासजमा झाला आहे. दांडिया मंदिरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी अर्थातच उत्साहाने स्वीकारले आहेत. आता नृत्याचा एक प्रकार म्हणून त्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन नवरात्रीत गरबा-दांडिया खेळणारी तरुणाई ठिकठिकाणी पाहायला मिळते. त्याचसोबत अनेक ठिकाणी सेलिब्रिटीही आपल्याला गरबा खेळताना दिसतात. गरब्याचा मनमुराद आनंद लुटायला प्रत्येकालाच आवडतो. पण, यंदाच्या या उत्सवात तुम्हाला ताल ठेका न धरता ‘लूजरवाली गरबा स्टेप’ करून दाखवायची आहे. विशेष म्हणजे या स्टेपची सुरुवातही झाली असून, अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेच हे ‘चॅलेंज’ सर्वांसमोर आणले आहे.

वाचा : पुलकित-यामीबाबत चर्चा नको; सलमानची बहिण श्वेताचा मौनी आणि रिचाला दम

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तेजस्विनी आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना दिसते. तिच्याकडे एक पत्रकार नवरात्रीसाठी बाइट मागत असताना ती बाइटसाठी तिला नकार देते. त्यानंतर अचानक तेजस्विनीच्या मनात काहीतरी येतं आणि ती स्वत:च्या आवडीची गरबा स्टेप करुन दाखवताना दिसते. त्यानंतर हा व्हिडिओ कुठेही पोस्ट करु नका असेही ती म्हणते. पण हा व्हिडीओ तिने स्वतः आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला. तेजस्विनी एवढ्यावरच थांबली नाही. तर तिने अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री नम्रता आवटे यांनाही त्यांची आवडती ‘लुजरवाली गरबा स्टेप’ करून दाखवण्याचे चॅलेंज दिलेय. त्यामुळे लवकरच आपल्याला या दोन्ही कलाकारांचेही व्हिडीओ पाहायला मिळतील. तसेच, ‘लुजरवाली गरबा स्टेप’ साठी ते कोणाला चॅलेंज देतात ते पाहणे रंजक ठरेल.

वाचा : ‘तारक मेहता..’मधून पत्रकार पोपटलालची होणार गच्छंती?

तेजस्विनीने व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, या नवरात्री उत्सवात काही तरी वेगळं करूया. माझ्या सोबत तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांना चॅलेंज करा LoserWaliGarbaStep आणि गरब्याचा आनंद घ्या.