२७ फेब्रवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा, आत्मियतेचा, मराठमोळ्या संस्कृतीचा आणि साहित्याच्या गुणगौरवाचा हा दिवस. या दिनाचे औचित्य साधत सेलिब्रिटींनीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
सुप्रभात !
आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस.
आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मराठमोळ्या शुभेछा !#अभिजातमराठी pic.twitter.com/VDGNtqkNWG
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) February 27, 2018
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. #MarathiBhashaDin
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 27, 2018
Good news on a great Day. मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. pic.twitter.com/N3RtqrTMR0
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) February 27, 2018
जागतिक मराठी भाषा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मराठी साहित्याचा मानदंड असलेले ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.#Marathi #अभिजातमराठी #MarathiBhashaDin pic.twitter.com/353buhB7AV
— Praful Patel (@praful_patel) February 27, 2018
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…#अभिजातमराठी i pic.twitter.com/PKA6GQqLH8— Suyash Tilak… (@suyashtlk) February 27, 2018