सध्या दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसं पाहिलं तर दिवाळीला सुरुवातही झाली आहे. कारण, वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात होते असं म्हणतात. यंदा सण इतक्या पटापट आल्यामुळे गृहिणींची चांगलीच धांदल उडतेय. त्यातही दिवाळीच्या फराळासाठीची लगबग, तो नीट होतोय की नाही यासाठी जीवाला लागून राहिलेली हुरहूर या साऱ्या गोष्टी सध्या घराघरात पाहायला मिळत आहेत. अशा या सणाच्या शुभमूहुर्तावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ काही पाककृती तुमच्या भेटीला आणत आहे. ह्या पाककृती तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींनी सांगितल्या आहेत.

या चवदार प्रवासाची सुरुवात करण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे एक आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी पाककृती. दिवाळीत गोडाचे पदार्थ खाऊन जर थोडी उसंत मिळाली किंवा गोडाच्या पदार्थांपासून पळ काढण्याची इच्छा झाली तर सोनालीचा हा पदार्थ तुमची जीभेचे चोचले नक्कीच पूर्ण करेल यात शंका नाही. कारण तो पदार्थ आहेच तसा. अर्थात त्या पदार्थासाठी लागणारी मुख्य सामग्री कितपत मिळेल यात शंका, कारण या पदार्थाचं नाव आहे ‘किसलेल्या कैरीची चटणी’. आता कैरीची चटणी म्हटलं की, कैरीचे दिवस तर गेले, अशी प्रतिक्रिया बरेचजण देतील. पण, बऱ्याच बाजारपेठांमध्ये कैरी बाराही महिने विकत मिळते. त्यामुळे त्याबद्दल फारसा विचार न करता जाणून घेऊया सोनाली या पदार्थाबद्दल काय म्हणतेय…

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

‘दिवाळीच्या अनुशंगाने हा तसा गटाबाहेरचा पदार्थ आहे. पण, तरीही तो अनेकांना आवडेल. आपण, लगेचच त्याच्या कृतीकडे वळूया. कारण फार कमी साहित्य आणि कमी वेळात बनणारा असा हा पदार्थ आहे.’

त्यासाठी लागणारं साहित्य आहे…
२ कैऱ्या (किसलेल्या)
शेंगदाण्याचं कूट (४ टेबलस्पून)
गुळ, मीठ चवीनुसार
बारिक चिरलेली कोथिंबीर
तिखट
(किसलेला कांदा पर्यायी)

फोडणीसाठी साहित्य-
तेल (१ टेबलस्पून)
अख्ख्या मेथ्या (दोन कैऱ्यांसाठी १ टीस्पून मेथ्या)
मोहरी (१ टेबलस्पून किंवा आवडीनुसार हे प्रमाण वाढवूही शकता)
हळद
कढिपत्ता

कृती-
एका भांड्यात सालं काढलेल्या दोन कैऱ्या छान किसून घ्यायच्या.
त्यानंतर त्यामध्ये ४ टेबलस्पून दाण्याचा कूट, अंदाजाने गुळ, मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात वरती तिखट घालावं. हे सर्व तयार झाल्यानंतर आपण वळूया फोडणीकडे.
फोडणीसाठी एका गॅसवर एका भांड्यात तेल चांगलं गम करुन त्यात भरपूर (१ टेबलस्पून) मोहरी, हळद, कढिपत्ता आणि अख्ख्या मेथ्या घालायच्या. साधारण दोन कैऱ्या असल्यास १ टीस्पून भरुन मेथ्या या फोडणीत घालायच्या.
सर्व साहित्य तेलात छान तडतडून त्यातील सुगंध आणि चव बाहेर आल्यानंतर गॅस बंद करुन ही गरम फोडणी तिखट आणि कैरीच्या त्या मिश्रणावर ओतायची आणि सर्व मिश्रण छान एकजीव करुन घ्यायचं.
बरेचजण या चटणीमध्ये किसलेला कांदा घालतात. पण, सगळ्यांनाच कांदा आवडतो असं नाही त्यामुळे तो आवडीनवडीवर अवलंबून आहे.
एकजीव केलेली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे. ती तुम्ही पोळी, ब्रेड, वरण-भात अशा कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. त्यामुळे जरुर बनवून पाहा आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत अशी ही कैरीची चटणी.

(शब्दांकन- सायली पाटील)
sayali.patil@loksatta.com