मराठी सिनेसृष्टीतील सध्याची प्रसिद्ध जोडी उर्मिला आणि आदिनाथ कोठारे हे लवकरच आई-बाबा होणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सगळ्यांना कळले होते. पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं. उर्मिला हा अनुभव तिच्या चाहत्यांसोबत अनेकदा शेअरही करत असते. ती चाहत्यांसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत असते.

https://www.instagram.com/p/BdZS-l_BaJi/

agastya nanda navya nanda video_cleanup
‘जेंटलमन’! बहीण नव्याचा ड्रेस नीट करणाऱ्या अगस्त्य नंदाचं नेटकऱ्यांना कौतुक, व्हिडीओ होतोय व्हायरल
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”

सोशल मीडियावर ती गरोदरपणातले व्यायाम आणि त्यासंबंधी निगडीत अनेक व्हिडिओ शेअर करत असते. आताही तिने असाच एक विनोदी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती डबस्मॅशवर ‘बेबी को बेस पसंत है’ या गाण्यावर हलकेसे नाचताना दिसत आहे. उर्मिलाचा हा व्हिडिओ पाहून ती किती उत्साही आणि आनंदी आहे याचा अंदाज येतो.

https://www.instagram.com/p/BcRsPw-Bk2_/

उर्मिला उत्तम अभिनेत्री तर आहेच त्याचसोबत ती एक नृत्यांगनासुद्धा आहे. सिल्क एरियल योगमध्ये ती तरबेज आहे. आता गरोदरपणात सिल्क एरियल योग आणि नृत्य या गोष्टी करता येत नसल्या तरी ती क्लासमधल्या मुलांना जमेल तसे शिकवायला जाते. डॉक्टरांनी अॅक्टिव्ह राहण्याचा सल्ला दिल्यामुळे घरी बसून न राहता क्लासला जाण्याचा दैनंदिन उपक्रम सुरु असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. नृत्यासोबतच ती रोज योगासनही करते.

https://www.instagram.com/p/BcUc-XHhA26/