अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले या दोन्ही कलाकारांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. मात्र आजही त्यांच्या कामात उत्साह दिसून येतो. विविध चित्रपट, रिअॅलिटी शो, जाहिरात यांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यातच आता ही जोडी लवकरच ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात हे दोघंही एकमेकांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात झळकणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

अमिताभ यांनी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित ‘आक्का’ ( १९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. आता २६ वर्षांनी बिग बी मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

Marathi Films Clash, Maharashtra Day, Nach Ga Ghuma, Swargandharva Sudhir Phadke, Theatres, IPL and Lok Sabha Election, marathi films, maharashtra din, 2 marathi movies clash, maharashtra din 2024, maharashtra day, entertaintment news, new marathi film,
‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने
Ghilli re release record break box office collection
पुन्हा प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, अवघ्या ८ कोटींचं बजेट अन् २० वर्षांनी कमावले तब्बल…
colors marathi announces new marathi serial abeer gulal
नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?


प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन दिसत असून अमिताभ यांनी निळ्या रंगाच्या चौकटी असलेलं जॅकेट परिधान केलं आहे. तर विक्रम गोखले यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तसंच या दोघांच्या पाठीमागे एक मोठं घरं दिसत आहे. या घरापुढे असलेल्या अंगणात काही आजी-आजोबा गप्पा मारताना दिसत आहेत.

वाचा : अभिनयचं नाही, तर ‘हे’ कलाकार शिक्षणातही टॉप

 या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या कलाकारांची ऑनस्क्रीन मैत्री येत्या १३ मार्चला पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie ab ani cd amitabh bacchan first look release ssj
First published on: 11-02-2020 at 12:00 IST