कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाचं सर्वच स्तरांवरून कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘फर्जंद’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे यातील मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद. ही भूमिका अंकित मोहन या कलाकाराने साकारली आहे. या अंकितचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
‘फर्जंद’मधली अंकितची सहकलाकार मृण्मयी देशपांडेसोबत हा फोटो असून यामध्ये त्याचा क्लिन शेव्ह लूक पाहायला मिळत आहे. फर्जंदच्या भूमिकेत असलेल्या अंकित मोहननं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. अंकितने या भूमिकेत स्वत:ला झोकून दिलं होतं असंच म्हणावं लागेल. अंकित हा अमराठी असला तरी त्याच्या संवादातून, देहबोलीतून हे आपल्याला थोडंदेखील जाणवलं नाही. अशा या अंकितने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली.
#कोंडाजी आणि #केसर.. @ankittmohan #memories #goa #filmfestival #farjand #film pic.twitter.com/ocoEFu3BbJ
— mrunmayee (@Mrunmayeeee) June 18, 2018
वाचा : तुमची डोकेदुखी अजून वाढवायला येतोय ‘रेस ४’
महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये घसघशीत यश मिळवत बॉक्स ऑफिसवर ‘हाऊसफुल’ कलेक्शन करीत सुपरहिट चित्रपटाचा मान ‘फर्जंद’ने पटकावला. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर व समीक्षकांनीही ‘फर्जंद’ला पसंतीची पावती दिली.