‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा, या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणुकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. बाबासाहेबांचं मुंबई शहराशी खूप भावनिक नातं होतं. या शहराच्या उभारणीत जितकं देता येईल तितकं बाबासाहेबांनी भरभरून दिलं आहे. मग ती शहराची रचना असो, कॉलेजेस, लायब्ररी, वॉटर मॅनेजमेंट, ग्रीड सिस्टीम, कामगार चळवळ आणि बरंच काही. बाबासाहेबांच्या मुंबई वास्तव्यातल्या अनेक गोष्टी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून उलगडत आहेत.

दापोली, सातारा असा प्रवास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी रहायचे , त्यांच्या घराचा इतिहास काय हे फार कमी जणांना माहित आहेत. बाबासाहेबांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजीबाबांनी परेलमध्ये संपूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती. परेलच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांचं कुटुंब तब्बल २२ वर्षे रहात होतं. बाबासाहेबांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी या वास्तुशी निगडित आहेत. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बी. ए. पूर्ण केले. खोली क्र. ५०मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.५१ स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले

बाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले, सार्वजिनक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह,जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास परेल इथल्या बीआयटी चाळीतल्या वास्तूस लाभला. या चाळीतून बाबासाहेब १९३४ ला दादरच्या नव्यानं बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५० नंबरची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी तर ५१ नंबरची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक. जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तिथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान असल्याचं हे दोन्ही कुटुंबीय सांगतात. ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या वास्तूला अवश्य भेट देतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करुन माहितीही देतात. बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात. भागुराम खैरे यांनी या ५१ नंबरच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. अगदी तेच दार, तोच कडीकोयंडा,खिडकीसुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट आणि कोबा आहे. परळच्या बीआयटी चाळीने २०१२ मध्ये शंभरी पार केली आहे. बाबासाहेबांच्या वास्त्व्याने पावन झालेली ही वास्तू म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे.