छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मलिकांमधली पात्रं, त्यातल्या घडामोडी, मालिकेत येणारे चढ- उतार हे ती मालिका नियमीत पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या आयुष्याचाच जणू एक भाग बनला आहे. त्यात दरआठवड्याला येणारे नवनवे ट्विस्ट हे प्रेक्षकांना खिळवून ठेवत असतात. याचवर तर मालिकेची लोकप्रियताही ठरली असते. या लोकप्रियतेवरून मालिकेचा टिआरपी किती हे ठरतं. हा टीआरपी दर आठवड्याला कमी जास्त होत असतो आणि दरआठवड्याला याच टीआरपीच्या आकड्यावरून कोणती मालिका वरचढ ठरली हे कळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर गेल्या आठवड्याच्या टीआरपीनुसार झी मराठीच्या पाचही मालिका या सर्वाधिक टीआरपी असणाऱ्या मालिका ठरल्या आहेत. यात पहिल्या स्थानावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ दुसऱ्या स्थानावर ‘तुझ्यात जीव रंगला’ तर तिसऱ्या स्थानावर ‘तुला पाहते रे’ ही मालिका आहे. टीआरपीच्या यादीत ‘राधिका’ ही सलग दुसऱ्या आठवड्यातही अव्वल ठरली आहे. या मालिकेनं टीआरपीच्या यादीत आपलं पहिलं स्थान अजूनही कायम ठेवलं आहे. त्यातून शनायाच्या आईची एण्ट्री झाल्यापासून मालिकेला पुन्हा एकदा वेगळं वळण लाभलं आहे.

‘तुला पाहते रे’ चा टीआरपी मात्र गेल्या आठवड्यात घटलेला पाहायला मिळाला. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिच मालिका दुसऱ्या स्थानी होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार या दोघांचीही केमिस्ट्री लोकांना फारच आवडत आहे. मात्र या मालिकेवर राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी भारी पडली आहे. त्यामुळे ‘तुला पाहते रे’ मालिकेला मागे टाकत ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका दुसऱ्या स्थानी आली आहे.

चौथ्या स्थानावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आहे तर पाचव्या स्थानावर ‘चला हवा येऊ द्या’ हा शो आहे. यापूर्वी आठवड्यातून दोनदाच येणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi serial trp rating of 1 december to 7 december