आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी अमुक वयाची किंवा वेळेची वाट पाहत राहण्याची काहीच गरज नसते. याचा पुरेपूर प्रत्यय गायिका सुनिधी चौहानच्या कारकिर्दीवर नजर टाकताच येतो. संगीत जगतामध्ये आपल्या अनोख्या गायनशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुनिधी चौहानच्या कारकिर्दीचा चढता आलेख पाहता अनेकांनाच तिचा हेवा वाटतो. हिंदी, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी, उर्दू या भाषांमध्ये सुनिधीने आजवर बरीच गाणी गायली आहेत. याशिवाय ती हटके स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. कलाकार कुटुंबातील सुनिधीच्या गायन कौशल्याची जाणीव प्रसिद्ध सूत्रसंचालिका आणि ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांना झाली होती.

एका कार्यक्रमादरम्यान, सुनिधीमध्ये असणारा बाणेदारपणा पाहता त्यांनी तिच्या पालकांना मुंबईत येण्यास सांगितलं. मुंबईत आल्यानंतर सुनिधीने दूरदर्शनवरील ‘मेरी आवाज सुनो’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. याच कार्यक्रमापासून तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी तिला राम गोपाल वर्माच्या ‘मस्त’ चित्रपटामध्ये काम करण्याती संधी मिळाली होती. या चित्रपटातील सर्वच गाणी हिट ठरली. इतकच नव्हे तर, ‘रुकी रुकी सी जिंदगी’ या गाण्यासाठी सुनिधीला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी आपल्या अगदीच वेगळ्या आवाजामुळे सुनिधीचं नाव चित्रपटसृष्टीत चर्चेत होतं. जवळपास प्रत्येक चित्रपटामध्ये तिचं एकतरी गाणं होतच. व्यावसायिक क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या या गायिकेचं खासगी आयुष्य मात्र फारसं चांगलं राहिलं नव्हतं. वयाच्या १८ व्या वर्षी तिने आपल्याहून १४ वर्षांनी मोठया चित्रपट दिग्दर्शक बॉबी खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. तरीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सुनिधी बॉबीसोबतच राहू लागली. पण, प्रेमाच्या पायावर उभं राहिलेलं त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

man killed his one-day-old baby due to having doubts on wifes character
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

लग्नानंतरच्या एक वर्षातच सुनिधी आणि बॉबी एकमेकांपासून वेगळे झाले. त्यादरम्यानच कुटुंबियांनीही तिच्यासोबतची सर्व नाती तोडली होती. तो काळ तिच्यासाठी संघर्षाचा ठरला असून, तिला काही अडचणींचाही सामना करावा लागला होता. त्या दिवसांमध्ये सुनिधीकडे राहण्यासाठीसुद्धा घर नव्हतं. त्यामुळे संगीत दिग्दर्शक अनू मलिकने तिला आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिलेली. हा तिच्यासाठी बराच कठीण काळ होता. कारण, यादरम्यानच इतरही काही गायिका नावारुपास येऊ लागल्या होत्या. पण, सुनिधीने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या करिअरकडे लक्ष दिलं आणि संगीत विश्वातील स्थान अबाधित राखलं.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

वैवाहिक जीवनात अपयशी ठरलेली सुनिधी संगीत क्षेत्रात बरंच यश मिळवत होती. असं असतानाच तिच्या आयुष्यात संगीत दिग्दर्शक हितेश सोहनीच्या रुपात पुन्हा एकदा प्रेमाची पालवी फुलली. हितेश आणि सुनिधी बालपणीपासूनचे मित्र होतेच. पण, त्यानंतर या दोघांनीही हे नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सुनिधी चौहानने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत बरेच चढउतार पाहिले आहेत. रिअॅलिटी शोची स्पर्धक ते परिक्षक या प्रवासादरम्यान बऱ्याच प्रसंगांचा सामना करत ही गायिका स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहे हे नाकारता येणार नाही.