बॉलिवूड, टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्रा हा व्हिजे आणि मॉडेल असलेल्या अनुषा दांडेकरला गेल्या बऱ्याच काळापासून डेट करत आहे. हे दोघही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. अनेकदा त्यांना सोशल मीडियावरील पोस्टवरून ट्रोलही केले जाते. पण, तरीही नेटिझन्सना चोख उत्तर देत ते त्यांच्या मनाप्रमाणे पोस्ट्स करताना दिसतात.

PHOTOS : आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

सध्याच्या घडीला अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत असल्याचे पाहावयास मिळतेय. त्यामुळे करण आणि अनुषाही या वर्षभरात लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अगदी करणने अनुषाला लग्नासाठी प्रपोज केल्याचेही म्हटले जातेय. पण, सर्व चर्चांमागचे सत्य या प्रेमीयुगुलांनाच माहिती आहे. या सर्व चर्चा ऐकताच करणला तर त्याचे हसूच आवरले नाही. तो म्हणाला की, मी अजून तरी अशा काही अफवा ऐकलेल्या नाहीत (हसत). अनुषाच्याही कानावर असं काही पडले असेल असे मला वाटत नाही.

VIDEO : ‘पद्मावत’चा नवीन टीझर पाहिलात का?

जोडीदारांप्रमाणे वावरत असलेल्या या प्रेमीयुगुलांवर कुटुंबातून लग्नासाठी काही दबाव आहे का, असा सवाल केला असता करण म्हणाला की, खरं सांगायचे तर सध्या तरी आम्ही आनंदात आहोत. आम्हाला आमच्या आयुष्याकडून काय हवं आहे याचा आम्ही विचार करतोय. त्याचसोबत आमच्या करिअरवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याकडून वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. त्यामुळे सध्यातरी माझ्यासाठी लग्न हे सर्वस्व नसून मी त्याला प्राधान्यही देत नाही.