‘मसान’ ते ‘मनमर्जियां’ चित्रपट.. हा प्रवास अभिनेता विकी कौशलसाठी सोपा नव्हता. वडील श्याम कौशल हे चित्रपटसृष्टीत नावाजलेले अॅक्शन दिग्दर्शक. तरीसुद्धा बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली. ‘मसान’, ‘राजी’, ‘मनमर्जियां’ अशा एकाहून एक दमदार चित्रपटांतून विकीने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. सहज अभिनय है त्याचं वैशिष्ट्य. एका आयटी कंपनीचं ऑफर लेटर फाडल्यानंतर अभिनय क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व शोधताना केलेली धडपड आणि त्यानंतर मिळालेलं यश याबद्दल विकीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. त्याचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

कॉलेजमध्ये असताना त्याने एका आयटी कंपनीत नोकरीसाठी त्याने अर्ज केला होता. ती नोकरी करायची होती म्हणून नव्हे तर नोकरीसाठी अर्ज करताना, इंटरव्ह्यू देताना येणाऱ्या भीतीचा अनुभव घेण्यासाठी. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विकीच्या वडीलांना त्याने ९-५ वेळेतली एखादी नोकरी करावी अशीच इच्छा होती. वडिलांच्या संघर्षाबद्दल त्याने सांगितलं, ‘जेव्हा माझ्या आईने त्यांच्याशी लग्न केलं, तेव्हा ते एका छोट्याशा घरात राहत होते. त्या घरात फक्त एक चटई आणि एक खुर्ची होती. तिथपासून स्वत:च्या कष्टाने वडिलांनी सर्वकाही उभारलं. हे सर्वकाही सोपं नव्हतं. त्यांनी घेतलेल्या या मेहनतीची जाणीव त्यांनी मला सदैव करून दिली. म्हणूनच अभिनेता होण्याच्या माझ्या स्वप्नाबद्दल त्यांना जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी मला वाटेत येणाऱ्या संघर्षाची कल्पना दिली. त्यावेळी मी आयटी कंपनीतल्या नोकरीचा ऑफर लेटर फाडून टाकला आणि ऑडीशन्ससाठी फिरू लागलो.’

sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

‘अभिनय क्षेत्रात जेव्हा पहिलं काम मिळालं, तेव्हा मी किती मागे आहे याची जाणीव झाली. आता तर हातात नोकरीसुद्धा नाही असे विचार घरी परतताना येत होते. मी घाबरलो होतो पण धीर सोडला नाही. बऱ्याच ऑडीशन्सनंतर अखेर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ चित्रपटातली भूमिका मिळाली. माझ्या वडिलांनी तेव्हा पहिल्यांदा माझं काम मोठ्या पडद्यावर पाहिलं. अनेकांनी माझी प्रशंसा केली. ‘विकीचे वडील’ म्हणून त्यांना विचारू लागले आणि ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात.’
‘स्वत:च्या पैशाने जेव्हा कार विकत घेतली तेव्हा आयुष्याचा अत्यंत आनंदाचा क्षण होता. ती कार घेण्यासाठी मी आईला शोरुममध्ये घेऊन गेलो होतो. लहानपणी तू खेळणीतल्या गाड्यांकडे पाहून खूश व्हायचा आणि आता तू स्वत:च्या पैशाने विकत घेतलेल्या गाडीमध्ये मी बसणार आहे, असं भावूक झालेली आई म्हणाली होती. त्यावेळी तिचे डोळे पाणावले होते.’

अभिनेता म्हणून विकी कौशला हा प्रवास भारावून टाकणारा आहे. स्वत:चा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. आगामी ‘उरी’ या चित्रपटातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.