टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदकं मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचं सर्वत्र कौतुक होतंय. मीराबाईची सध्या अनेक स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत. सलमान खानची मोठी फॅन असलेल्या मीराबाईला रौप्य पदक जिंकल्यानंतर सलमानची भेट घेण्याची संधी मिळाली. मीराबाईला लहानपणापासूनच डान्सची मोठी आवड आहे. नुकतीच मीराबाईने ‘डान्स दीवाने’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माधुरी दीक्षितला भेटल्यानंतर मीराबाईचा आनंद ओसंडून वाहत होता. माधुरीच्या भेटीने यावेळी मीराबाई भावूक झाल्याचं दिसून आलं.

१५ ऑगस्टला भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या नित्ताने ‘डान्स दीवाने शोमध्ये ‘सलाम इंडिया’ नावाने खास एपिसोड पाहायला मिळेल. या खास भागात मीराबाई चानूसह भारताचे माजी क्रिकेटर कपील देव तसंच मोहिंदर अमरनाथ , लाली भवानी देवी आणि प्रिया मलिक यांची खास हजेरी पाहायला मिळणार आहे. या खास एपिसोडमध्ये मीराबाईचा खडतर प्रवास दाखवणारा परफॉर्मन्स पाहून सगळेच थक्क झाले. तर हा डान्स परफॉर्मन्स पाहून मीराबाईदेखील भावूक झाली आणि तिला अश्रू आवरणं कठिण झालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे देखील वाचा: “मला सनातन धर्माचं ज्ञान देताय…”; बोल्ड ड्रेसमुळे ट्रोल झालेल्या कंगनाने नेटकऱ्यांना सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शोमध्ये मीराबाई म्हणाली, “या शोमध्ये येऊन मला खूप छान वाटलं. मी कधी विचारही केला नव्हता की मी या शोमध्ये येईन आणि माधुरी मॅमना भेटू शकेन. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. लहान पणापासूनच मला डान्सची आवड आहे.” असं म्हणत मीराबाईने तिचा आनंद व्यक्त केला. या शोमध्ये खास मीराबाईचा आवडता पदार्थ म्हणजेत पिझ्झा मागवण्यात आला होता. या साठीदेखील मीराबाईने सर्वांचे आभार मानले.
या खास भागात मीराबाईसह प्रिया मलिक आणि भवानी देवी या तिघींनी मंचावर येऊन ठुमके लगावले आणि स्पर्धकांसोबत धमाल करत त्यांना प्रोस्ताहन दिलं.