सध्या बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि क्रीडा विश्वातील अनेक जोडपी लग्न करत आहेत. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या कानावर पडत आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री आश्का गोरडिया - ब्रेण्ट गोबल आणि 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग - हर्ष लिंबाचिया या दोन जोड्या येत्या ३ डिसेंबरला लग्न करणार आहेत. पण त्याआधी काल एकाच दिवशी तब्बल तीन सेलिब्रिटी जोड्या विवाहबंधनात अडकल्या. स्मृती खन्ना - गौतम गुप्ता, सिद्धार्थ वीर सूर्यवंशी - अलेसिया राऊत, नमन शॉ - नेहा मिश्रा या तीन जोड्या काल विवाहबद्ध झाल्या. PHOTO : अभिनेते जयवंत वाडकर यांची 'ग्लॅमरस' कन्या ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता काल विवाहबंधनात अडकले. जे डब्ल्यू मॅरिएटमध्ये झालेल्या या लग्नाला दोघांचे नातेवाईक आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकार मंडळी उपस्थित होती. तसेच, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि अभिनेता झाएद खान हेदेखील या पाहुण्यांमध्ये होते. सिद्धार्थ वीर सूर्यवंशी आणि सुपर मॉडेल अलेसिया राऊत यांनी पारंपरिक पद्धतीने मुंबईत लग्न केले. जवळच्या मित्रामुळे या दोघांची ओळख झाली आणि अवघ्या काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी एप्रिलमध्ये साखरपुडा केला. अलेसियाने यापूर्वी रशियन अर्थशास्त्रज्ञाशी लग्न केले होते. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. तर सिद्धार्थचेही हे दुसरे लग्न असून, त्याला १२ वर्षांची मुलगी आहे. PHOTOS : आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली अभिनेता नमन शॉने त्याची सर्वात जवळची मैत्रीण नेहा मिश्रा हिच्याशी कोलकात्यात धुमधडाक्यात लग्न केले.