अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हिन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, त्याचे अनेक मुलींशी संबंध होते, असा आरोप सनाने केला. या आरोपांवर आता लुईसने प्रत्युत्तर दिले आहे.
अवश्य वाचा – ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट
अवश्य वाचा – प्रेम शेअर करा पण ****** करु नका; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप
काय म्हणाला मेलव्हिन लुईस?
मेलव्हिनने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो पतंगचा मांजा गुंडाळताना “बुलाती है मगर जाने का नहीं” असे म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने सना खानच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
अवश्य पाहा – ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?
अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा
सोशल मीडियावर सध्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हे वाक्य जोरदार व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर मेलव्हिन लुईसचा देखील व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी काय म्हणाली होती सना खान?
“खरं तर पहिल्यांदाच मी आमच्या नात्याविषयी इतक्या मोकळेपणाने बोलत आहे. खरं बोलायला खूप हिंमत लागते. जवळपास वर्षभरापूर्वी त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध होते. माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं” अशा आशयाची पोस्ट सनाने लिहिली होती.