मिलिंद सोमण याचा फिटनेस आणि त्याच्या लूकचे अनेकजण चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मिलिंद त्याच्या पिंकथॉनसाठी जेवढा चर्चेत येत आहे तेवढाच त्याची प्रेयसी अंकिता कोनवारमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. ५२ वर्षीय मिलिंदने २७ वर्षीय अंकिताशी साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने मिलिंदचा हात पकडलेला दिसत आहे. हातात हात पकडलेला तिच्या फोटोपेक्षा मिलिंदच्या चाहत्यांचे अंकिताच्या अंगठीकडे अधिक लक्ष जाते. या फोटोमुळे मिलिंद- अंकिताने साखरपुडा केला असल्याचे म्हटले जात आहे.

https://www.instagram.com/p/BhQau3rh0o8/

रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि मिलिंदमधील वयाचा फरक लक्षात घेता अंकिताच्या कुटुंबियांकडून या नात्याला विरोध केला जात होता. म्हणून काही दिवसांपूर्वी मिलिंद अंकिताच्या कुटुंबियांना भेटला होता. त्यांच्याशी बोलल्यानंतर अंकिताच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदील दिला. यावर्षी हे प्रेमीयुगुल लग्नबंधनात अडकतील असेही म्हटले जात आहे.

https://www.instagram.com/p/BgvHGb2hljU/

मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. लोकांच्या मतांची फारशी पर्वा न करता तो अनेकदा अंकितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अंकिता आणि तो सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/p/BgffotzBcPw/

सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल फारशा सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही. मात्र, तरीही मिलिंद त्यांच्या नात्याबद्दल ठाम आहे. मिलिंदच्या प्रेयसीचे खरे नाव अंकिता नसून संकुस्मिता कोनवार आहे. संकुस्मिता २०१३ पासून एका एअरलाइनमध्ये ‘केबिन क्रू’ म्हणून काम करते आहे. मिलिंदने अलिशा चिनॉयच्या ‘मेड इन इंडिया’ या गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

https://www.instagram.com/p/BgOJbrSh6ik/