वर्कआऊट करणं आणि त्यात सातत्य ठेवणं सहजसोपं नसतं. तेसुद्धा वयाच्या ८१ व्या वर्षी. बसला ना तुम्हालाही आश्चर्याचा धक्का? अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमणची आई उषा सोमण या ८१ वर्षांच्या आहेत. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. त्या कधी सुनेसोबत लंगडी खेळताना दिसतात तर कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या मारताना दिसतात. उषा सोमण या नेटकऱ्यांसाठी नवीन आदर्श ठरतायत.

मिलिंद सोमणने आईसोबत दोरीवरच्या उड्या मारतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘हे तिच्यासाठी नवीन नाही पण माझ्यासाठी नवीन आहे. लॉकडाउनमध्ये तुम्ही एकमेकांना नव्या गोष्टी शिकवाव्यात’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. साडी नेसलेल्या उषा सोमण यांचा हा उत्साह भल्याभल्यांना लाजवणारा आहे. वय हा फक्त एक आकडा असतो, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय.

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Numerology Girls born on this date are lucky for husband
Numerology: नवरा आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात या जन्मतारखेच्या मुली; जाणून घ्या त्या तारखा कोणत्या?

आणखी वाचा : बापलेकीची जुगलबंदी; सचिन व श्रिया पिळगावकरच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 

मिलिंदने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उषा सोमण यांचा हा उत्साह खरंच कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.