बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती गेल्या अनेक दिवसांपासून ‘मीमी’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मीमी’चा ट्रेलर नुकताच पदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर क्रितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
क्रितीने हा ट्रेलर तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये तिच्या स्वप्नांची एक झलक पाहायला मिळतं आहे. या ट्रेलरमध्ये क्रितीला एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी विचारण्यात येते. या साठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते. त्यानंतर पंकज त्रिपाठी त्या बाळाचे वडील आहेत, असं खोटं क्रिती तिच्या आई-वडिलांना सांगते. तर सई ताम्हणकर क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
#Mimi expected everything, except for this unexpected journey!
Watch the glimpse of her unexpected story with your family. #MimiTrailer out now: https://t.co/S9jZvejnfR
Releasing on 30th July on @JioCinema & @NetflixIndia. #NothingLikeWhatYoureExpecting— Kriti MIMI Sanon (@kritisanon) July 13, 2021
आणखी वाचा : ‘निक प्रियांकाला १० वर्षांमध्येच घटस्फोट देईल?’; केआरकेची धक्कादायक भविष्यवाणी
या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करणार आहेत. हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.