बालपणात रममाण व्हायला प्रत्येकालाच आवडतं. आपल्याच लहानपणीचा एखादा फोटो जरी आपण पाहिला तरी त्या जुन्या आठवणींमध्ये काही काळ हरवून जातो. आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे एखादा असाच जुना किंवा बालपणीचा फोटो सापडल्यानंतर आपण तो फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवतो. तसंच कलाविश्वातील सेलिब्रिटीही करताना दिसतात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात सध्या कलाविश्वातील एका चिमुकलीचा फोटो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली आता मोठी झाली असून ती लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून तरुणींच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता म्हणजे. शाहिद कपूर. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिदने त्याच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. या चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. चित्रपटांमुळे चर्चेत राहणाऱ्या शाहिदची पत्नीदेखील त्याच्या इतकीच लोकप्रिय आहे.

 

View this post on Instagram

 

Stand tall, Stand strong

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

शाहिदची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून बऱ्याचदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये तिच्या मिशा आणि झैन या दोन मुलांचे सर्वाधिक फोटो असतात. मात्र यावेळी मीराने तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. मीराच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस असल्यामुळे तिने बहिणीसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

वाचा : Video : अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आईने लावला डोक्याला हात

दरम्यान, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे ७ जुलै २०१५ रोजी लग्न केलं. लग्नानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे मीशानंतर त्यांच्या आयुष्यात झैन हा नवा पाहुणाही आला आहे.