करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. कलाविश्वाला देखील याचा मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी चित्रीकरण थांबवल्यामुळे अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचा रस्त्यावर ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.
राजेश तैलंगने ट्विटर अकाऊंटवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रस्त्यावर रामलड्डू विकताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत राजेशने ‘लॉकडाउन खुले, करोना जाए तो फिर से धंधे पर लगें’ असे कॅप्शन दिले आहे.
Lockdown खुले , कोरोना जाए तो फिर से धंधे पे लगें ! pic.twitter.com/dlCPrFgJ2f
— Rajesh Tailang (@rajeshtailang) May 27, 2021
आणखी वाचा : ‘मसाबाने दुसरे लग्न करावे का?’, नीना गुप्ता म्हणाल्या…
राजेशच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींना हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटातील असल्याचे वाटत आहे तर काहींना राजेशवर आर्थिक संकट आल्याचे वाटत आहे.
राजेशने ‘मिर्झापूर’ या अतिशय लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्याने गुड्डू भय्याचे वडील रमाकांत पंडित यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले, त्याला लोकप्रियता मिळाली. त्याने ‘ढाई अक्षर’ या मालिकेत काम केले आहे.