‘मिर्झापूर’ची गोलू म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठीचा आज वाढदिवस आहे. श्वेताने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. ‘मसान’ ते ‘मिर्झापूर’पर्यंत श्वेताने आजवर हटके भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. मात्र हे स्थान गाठण्यासाठी श्वेताला मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी श्वेता एक फॅशन कम्यूनिकेशनचं शिक्षण घेत होती. मात्र शिक्षण घेत असतानाच श्वेताला अभिनयाची जडली होती. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार श्वेताने केला होता.

श्वेताच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या इच्छेवर तिच्या वडिलांची कशी प्रतिक्रिया होती याबद्दल श्वेताने तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं. श्वेता फॅशन कम्यूनिकेशनचं शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षात असतानाच तिने अभिनय क्षेत्राकडे वळण्यााच विचार केला होता. मात्र ही गोष्ट वडिलांना कशी सांगायची यासाठी तिला भीती वाटतं होती. या पोस्टमध्ये तिने वडिलांची प्रतिक्रिया कशी होते हे सांगितलं होतं. ती म्हणाली, “एक दिवस मी गच्चीवर कपडे वाळत घालत होते. तेव्हा मी माझ्या वडिलांना म्हणाले मला अभिनय करण्याची इच्छा आहे. मात्र यावेळी वडीलांनी मला अजिबात नकर न देता ते लगेचच म्हणाले ती तू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा का जॉईन करत नाहीस? तेव्हा मी अगदी निशब्द झाले. मला कल्पना नव्हती ते इतक्या सहज तयार होतील.” असं श्वेता तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. या शिवाय प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वाईट प्रसंगातही वडिलांनी कामय साथ दिल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं होतं. वडिलांमुळेच आज श्वेताला यशाचं शिखर गाठता आल्याचं ती म्हणाली आहे.

हे देखील वाचा: पती राज कौशल यांच्या निधनानंतर अभिनेत्री मंदिरा बेदीने घेतला ‘हा’ निर्णय!

पुढे ती म्हणाली, “मी किती सहज ही गोष्ट वडिलांकडे बोलले..खर तर हा मी अगदी पटकन घेतलेला निर्णय होता. मात्र तरीही त्यांनी माझा आदर राखत माझ्यावर विश्वास ठेवत मला पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी मला माझी ओळख निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळही दिला. आज मी जे काही आहे त्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं” असं म्हणत श्वेताने वडिलांचे आभार मानले.

फॅशनचं शिक्षण घेत असतानाच श्वेताने करिअर बदलण्याचा निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रात येण्याच्या तिच्या या निर्णयाला तिच्या आई-वडिलांनी देखील साथ दिली. २०११ सालामध्ये आलेल्या ‘तृष्णा’ या सिनेमातून श्वेताने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. मात्र ‘मसान’ या सिनेमामुळे श्वेताला खरी ओळख मिळाली.

श्वेता ‘हरामखोर’ आणि ‘गोन केश’ या सिनेमामध्ये झळकली आहे. याशिवा. ती ‘द ट्रिप’, ‘मिर्जापुर’, ‘द ट्रिप सीजन 2’ आणि ‘लाखों में एक’ या वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे. यात ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधील तिच्या गोलू या भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली.