मॉडेलिंग आणि कलाविश्वात सध्या एकाच नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे विश्वसुंदरी मानुषी छिल्लर. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेमध्ये मानुषीने जवळपास १३० सौंदर्यवतींना मागे टाकत भारताच्या मानुषीने बाजी मारली. २१ वर्षीय मानुषीच्या डोक्यावर ज्यावेळी ‘मिस वर्ल्ड’चा मुकूट घालण्यात येत होता तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.

चीनमधील सान्या येथे पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात मानुषीने सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. मानुषी मूळची हरयाणातील झज्जरची आहे. तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील इंग्रजी शाळेतून झाले. यानंतर सोनीपतमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून ती एमबीबीएसचे शिक्षण घेतेय.

मानुषी सुरुवातीपासूनच फार हुशार. त्यासोबतच काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्येही ती सहभागी व्हायची. अभ्यासासोबतच विविध कला शिकण्याकडेही तिचा कल आहे. ती एक उत्तम चित्रकार असून, कुचिपूडी या नृत्यप्रकाराचेही तिने रितसर शिक्षण घेतले आहे. जगातील अनेक सौंदर्यवतींमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मानुषीला पुढे जाऊन हृदयविकार तज्ज्ञ व्हायचे आहे. न्यूयॉर्कच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये तिने अभिनयाचेही शिक्षण घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात मानुषी बॉलिवूडमध्येही झळकली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मानुषी सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असून, बरेच फोटोही पोस्ट करत असते. या फोटोतून मानुषीचा बोल्ड अंदाजही सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे. अशा या महत्त्वाकांक्षी विश्वसुंदरीचा उल्लेख अनेकजण ‘ब्युटी विथ ब्रेन’ असाच करत आहेत.

https://www.instagram.com/p/BbYXunejyMh/

https://www.instagram.com/p/BbdblcmDkUl/

https://www.instagram.com/p/BbZ7eM9jtyn/

https://www.instagram.com/p/BbZiimTjCE0/

https://www.instagram.com/p/BbEkq6NjtLM/