बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवडचा डिस्को डान्सर अशी ओळख असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी आजवर जवळपास ३५० सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. उत्तम अभिनयासोबत त्यांच्या डान्सिंग स्टाइलचे अनेक चाहते होते. अनेक चाहते त्यांना प्रेमाने मिथुनदा म्हणतात. सिनेमांसोबतच मिथुन चक्रवर्ती यांनी कालांतराने राजकाराणात प्रवेश केला. राजकिय वर्तुळात देखील पक्ष बदलांमुळे मिथुन चक्रवर्ती कायम चर्चेत राहिले. मात्र मिथुन चक्रवर्ती यांचा आजवरचा हा प्रवास खूपच रंजक आहे. अभिनयात येण्याआधी मिथुन चक्रवर्ती एका नक्षलवादी समूहाचा हिस्सा होते. मात्र काही घटनांमुळे त्यांनी नक्षली मार्ग सोडला.
१९५० साली बांग्लादेशमध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांचं कुटुंब भारतात स्थलांतरित झालं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी मिथुन चक्रवर्ती एका नक्षलवादी समूहात कार्यरत होते. मात्र एका घटनेने त्यांनी नक्षलवादाकडे पाठ फिरवली. एका अपघातात मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाचं निधन झालं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मिथुन यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी नक्षलवाद सोडला आणि ते पुन्हा कुटुंबीयांकडे आले.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “फक्त काम मिळत राहवं”, बिग बींच्या पोस्टवर चाहते म्हणाले “आता पुरे..आराम करा”
मिथुन चक्रवर्ती यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते अनेक डान्स शो करत. मिथुन यांनी हेलन यांना देखील डान्समध्ये असिस्ट केलं होतं. कोलकत्ता इथं केमिस्ट्रीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. १९७६ सालात मिथुन यांनी ‘मृगया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
View this post on Instagram
मिथुन चक्रवर्ती यांची खासियत म्हणजे ते आलराऊंडर होते. अभिनयासोबतच उत्तम डान्स आणि अॅक्शनमुळे मिथुन चक्रवर्ती यांना मोठी लोकप्रियता मिळाली. हिंदी सोबतच त्यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी,तेलुगू, कन्नड़ आणि पंजाबी सिनेमांमधून त्यांची जादू दाखवली. मिथुन चक्रवर्ती यांचे तेरे प्यार में, प्रेम विवाह, हम पांच, डिस्को डांसर, हम से है जमाना, घर एक मंदिर, अग्निपथ, तितली असे अनेक सिनेमे प्रचंड गाजले.