सोनी टीव्हीच्या आगामी ‘द ड्रामा कंपनी’चा नवा लूक विनोदवीर सुदेश लेहरी याने सोशल मीडियावर शेअर केला. सुदेशने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेते मिथून चक्रवर्ती दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने म्हटले की, ‘लवकरच मी एक नवा शो घेऊन तुमच्या भेटीला येत आहे.’

या ड्रामा कंपनीचे मालक म्हणून मिथुन दिसणार आहेत. या कंपनीमध्ये कृष्णा अभिषेक, अली असगर, सुदेश लेहरी, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे कलाकार काम करताना दिसणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन लवकरच त्यांना एका सिनेमात काम करायला देतील हे सांगून कामावर घेतात. हे सगळे मिथुनसाठी एकत्र काम करायला तयार तर होतात पण त्यांचे एकमेकांसोबत पटत नाही. या शोमध्ये मिथुन यांची व्यक्तिरेखा भव्यदिव्य दाखवण्यात आली आहे. इतर कलाकारांसोबत तेही अनेक भागात अभिनय करताना दिसणार आहेत.

सुरुवातीला सुनील ग्रोवर या नाटक कंपनीचा एक भाग असेल असे म्हटले जात होते. पण आता मात्र तो या शोमध्ये दिसणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. तो एखाद वेळेस पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावू शकतो. जुलै महिन्यात हा शो प्रदर्शित करण्याचा वाहिनीचा प्रयत्न आहे. या शोसाठी एक वेगळी वेळ निवडण्यात येणार आहे. द कपिल शर्मा शोची वेळ आणि याची वेळ एकत्र ठेवण्यात येणार नाही.

‘सोनी एण्टरटेन्मेन्ट चॅनल’नेही द ड्रामा कंपनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ही सर्व कलाकार मंडळी समुद्र किनारी मजा करताना दिसत आहेत.

Story img Loader