मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले आहेत. मात्र, आता लवकरच राज ठाकरे यांची कन्या एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. घरामधूनच कलेचे बाळकडू मिळालेली उर्वशी ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या निमित्ताने उर्वशीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण होतंय. साहजिकच या चित्रपटात ती नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, उर्वशी या चित्रपटात ऑनस्क्रीन दिसणार नाही. तर, तिने ‘जुडवा २’च्या सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली आहे.

‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ‘राजकीय नेत्यांच्या मुलांचा एकंदर वावर जरा वेगळा असतो. पण, उर्वशीच्या बाबतीत तसं काहीच नव्हतं. ती खूप समंजस आहे. चित्रीकरणादरम्यान बराच काळ ती राज ठाकरे यांची मुलगी आहे, हे कोणाला ठाऊकही नव्हतं.’ किंबहुना डेव्हिड धवन यांनीही उर्वशीबाबतचं त्यांचं मत मांडलं. उर्वशी चित्रीकरणाच्यावेळी आणि या सर्व वातावरणाशी मिळतंजुळतं घेईल अशी अपेक्षा त्यांनी केली नव्हती. तिच्याविषयी सांगताना धवन म्हणाले, ‘तिला मी जेव्हा पहिल्यांदाच भेटलो तेव्हा ती शूटदरम्यान इतरांशी मिसळून वागेल का, याबद्दल साशंक होतो. पण, तिने अत्यंत समर्पक वृत्तीने आपली जबाबदारी पार पाडली. ती खूपच मनमिळाऊ असून, लगेचच आमच्या टीमसोबत रूळली.

mahayuti and maha vikas aghadi show strong strength during election campaign in mumbai
दुषणास्त्रांचा वर्षाव; शिवाजी पार्कात रालोआचे, बीकेसीमध्ये ‘इंडिया’चे शक्तिप्रदर्शन
swati maliwal allegetion
“माझी मासिक पाळी सुरू होती, तरीही पोटात लाथा मारल्या”, स्वाती मालिवाल यांचा एफआयआरमध्ये धक्कादायक दावा
Laila Khan Murder Case, Stepfather Parvez Tak, Laila Khan Murder Case Parvez Tak Convicted, Parvez Tak Convicted, court, marathi news, laila khan murder case news, crime news,
अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड, लैलाच्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले
mira bhaindar mla gilbert mendonca marathi news
माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांची भूमिका अस्पष्टच, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
congress leader prithviraj chavan attacked modi government in public meeting in sangvi
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार
palghar lok sabha hitendra thakur marathi news
पालघरमध्ये भाजपाला हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचेच आव्हान
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

आगामी काळात साजिद नाडियादवाला उर्वशीला तिच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करणार असल्याचं म्हटलं जातंय. ‘बाघी २’ या चित्रपटाशी तिचं नाव जोडलं जात आहे. पण, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाहीये. सध्यातरी उर्वशी तिच्या पहिल्या चित्रपटत साकारताना पाहून फारच आनंदात असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वशीने तिच्या करिअरला मोठ्या उत्साहात सुरुवात केली असून, आपल्याला अजून खुप पुढे जायचं आहे, त्यामुळे सध्यातरी माध्यमांसमोर येऊन संवाद साधण्याची माझी तयारी नाही, असं तिचं मत आहे.