बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने करोना माहामारीच्या काळात लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत माणुसकीचं दर्शन घडवलं. बेरोजगारांना रोजगार तर ऑक्सीजनसाठी धडपणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्सीजन उपलब्ध करून देत सोनूने गेल्या दीड दोन वर्षात लाखो नागरिकांना मदत केली आहे. त्यामुळे अनेक तरुणांसाठी सोनू प्रेरणास्थान बनला आहे. अशाच एका सोनू सूदच्या चाहत्याने त्याला आगळ्या वेगळ्या प्रकारे सलाम केला आहे.

सायकलस्वार असलेल्या उमा सिंहने अफ्रिकेतील किलिमंजारो या सर्वात उंच शिखरावर चढाई करत आपला हा विजय सोनू सूदला समर्पित केला आहे. सायकलस्वार उमा सिंहने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत तो म्हणतोय, “माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एक रियल लाइफ हिरो पाहिला आहे. मी त्यांच्यासाठी काही करू इच्छितो. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील कठीण काळात अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केला. तुम्ही आपल्या देशाचे खरे हिरो आणि आमच्या सारख्या लोकांसाठी मोठे भाऊ आहात सोनू सूद”

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उमा सिंहने लिहिलं आहे. “१५ ऑगस्टला मी अफ्रिकेतील सर्वात उंच माउंट किलिमंजारोच्या शिखरावर होतो. त्या व्यक्तीला समाल करण्यासाठी जो आधीच एका शिखरावर आहे. हा विजय केवळ सोनू सूद यांना समर्पित. कायम प्रेरणा दिल्याने धन्यवाद.” असं म्हणत उमा सिंहने सोनू सूदचे आभार मानले आहेत.

उमा सिंहच्या या कामगिरीनंतर सोनू सूदने देखील त्याचं कौतुक केलंय. ट्वीट करत सोनू म्हणाला, “मला उमाचा खूप अभिमान आहे. मोठ्या मुश्किलीने त्याने हे यश प्राप्त केलंय. यात त्याची मेहनत आणि जिद्द दिसून येते. मी त्याच्या बोलण्याने खूपच प्रभावित झालो. तरुणांसाठी तो प्रेरणास्त्रोत आहे.” असं म्हणत सोनूने सायकल स्वार उमाचं अभिनंदन केलंय.

Story img Loader