गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कलाकारांच्या निधनाच्या अफवा सुरु असल्याचे पाहायला मिळते. गायक लकी अली यांच्या पाठोपाठ अभिनेते मुकेश खन्ना यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. पण स्वत: मुकेश खन्ना यांनी व्हिडीओ शेअर करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. हे सर्व सुरु असतानाच मुकेश खन्ना यांच्या बहिणीचे निधन झाले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
मुकेश खन्ना यांनी बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी बहिणीच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘काल कित्येक तास मी माझ्या निधनाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगण्यासाठी संघर्ष करत होतो. पण तेव्हा मला कल्पनाही नव्हती की एक भंयकर सत्या माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले. तिच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. १२ दिवसांमध्ये करोनावर मात केल्यानंतर तिचे निधन झाले आहे’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
View this post on Instagram
मुकेश खन्ना यांनी स्वत:च्या निधनाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगत व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते ‘मी एकदम ठिक आहे. माझ्या निधनाच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत’ असे बोलताना दिसत होते.