मुल्क या सिनेमाचा ट्रेलर प्रकाशित झाला असून प्रतीक बब्बर, ऋषी कपूर मुस्लीमांच्या तर त्यांच्या वकिलाच्या भूमिकेत तापसी पन्नू दिसत आहे. दहशतवाद, घातपात, हिंदू मुस्लीम वाद, हा मुल्क कुणाचा असे धगधगते प्रश्न या सिनेमात हाताळले असल्याचे दिसत असून ट्रेलर तरी लक्ष खिळवून ठेवणारा आहे.
ट्रेलर अवघा अडीचेक मिनिटांचा असला तरी बरंच काही घडलेलं बघायला मिळतं. वाराणसीची धार्मिक पार्श्वभूमी चित्रपटाला आहे. शहरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पोलीस ऋषी कपूर व प्रतीक दोघांचा पिच्छा पुरवतात. तर तापसी पन्नू त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडताना दिसते. इस्लामला अन्य धर्मीय कुठल्या नजरेने बघतात, सगळे दाढीवाले दहशतवादी नसतात आणि सगळे हिंदू मुस्लीमद्वेष्टे नसतात असे पैलू ट्रेलरमध्ये दिसतात.
Here it is……
Kya yeh Mulk aapka Mulk hai???https://t.co/xJPrcPuxjs— taapsee pannu (@taapsee) July 9, 2018
या तिघांखेरीज मनोज पाहवा व रजत कपूर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये या चित्रपटात आहेत. अनुभव सिन्हानं हा चित्रपट दिद्गर्शित केला आहे. तुम बिन, दस व गुलाब गँगसारखे चित्रपट अनुभवनं दिले आहेत. या चित्रपटाचा विषयच सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असल्यामुळे सगळ्या टीमनं अत्यंत मन लावून केल्याचं याआधी एका मुलाखतीत तापसीनं सांगितलं होतं, जे ट्रेलरमध्ये तरी जाणवत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुख्यत: लखनौ व वाराणसीमध्ये झालं आहे. ३ जुलै रोजी चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.