सेन्सॉर बोर्डाने मराठी चित्रपटांना उगाच आडकाठी आणू नये. नाहीतर मराठी चित्रपटांचे विषय कधीच चौकटीबाहेर जाणार नाहीत, अशा शब्दांत ‘मुळशी पॅटर्न’चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यातील संवाद पाहता सेन्सॉर बोर्डाने ‘मुळशी पॅटर्न’ला ‘अ प्रमाणपत्र’ दिलं. समाज कसा बदलतोय आणि चित्रपटांचे विषय कसे बदलत आहेत याविषयी तरडेंनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बोलताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

‘आपणच काही चौकटी आखून ठेवल्या आहेत. मराठी प्रेक्षकांना प्रेमकथा, कौटुंबिक, विनोदी असेच चित्रपट आवडतात असा आपला समज आहे. याच मराठी प्रेक्षकांनी फँड्री, कासवसारखे चित्रपट डोक्यावर घेतले आहेत. मराठी चित्रपट आता बदलला आहे हे सेन्सॉरने समजून घेतलं पाहिजे. मराठी दिग्दर्शकांना काहीतरी वेगळा प्रयत्न करायचा आहे, आपण त्यामध्ये आडकाठी आणू नका,’ असं ते म्हणाले.

चित्रपटाचं बदलतं स्वरूप आणि सेन्सॉर बोर्डाची भूमिका यावर प्रवीण तरडे काय म्हणाले ते पाहा-

(आणखी व्हिडिओ पाहा- ‘मुळशी पॅटर्न’नंतर प्रवीण तरडेंचा शिवाजी महाराजांवर बिग बजेट चित्रपट )

Story img Loader