बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ आहे. हे रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ आपल्याला नक्की मिळतील. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतात लोकप्रिय असलेले पदार्थ म्हणजे पाणीपुरी, डोसा, कुल्चा ते अनेक असे पदार्थ आहेत जे प्रत्येक भारतीय व्यक्तीला आवडतात. प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता त्यात आणखी एका सेलिब्रिटीच नाव समोर आलं आहे. लोकप्रिय निर्मात्या आणि थेटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोला जेम्स यांनी देखील आता प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
लोला यांनी अलीकडेच प्रियांका चोप्राच्या रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या मुंबईची शान म्हणजे आपला आयकॉनिक वडा पाव खाल्ला. याशिवाय लोलाने भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ‘यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेलं हे सोना अप्रतिम आहे. या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका,’ अशा आशयाचे कॅप्शन लोलाने हे फोटो शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका
जर तुम्हालाही प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटमध्ये वडापाव खाण्याची इच्छा झाली असेल. तर तुम्हाला या वडा पावची किंमत जाणून घेण्याची गरज आहे. प्रियांकाच्या सोनामध्ये एका वडा पाव खाण्यासाठी तुम्हाला १४ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार रुपये मोजावे लागतील. प्रियांकाच्या रेस्टॉरंटमध्ये वडा पाव मिळतो हे आधी कोणाला माहित नव्हते, मात्र आता मुंबई करांचा जीव की प्राण असलेला वडा पाव हा न्यूयॉर्कमध्ये ही लोकांच्या मनावर राज्य करतं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दरम्यान, प्रियांकाने तिच्या अॅमेझॉन प्राइमवरील ‘सिटाडेल’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे.