दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा नुकतेच विवाहबंधनात अडकले. गोव्यात मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. नागा चैतन्यसाठी सेलिब्रेशन अजूनही संपलेले नाही. आगामी ‘सव्यसाची’ या चित्रपटाच्या सेटवर गुरुवारी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये त्याची पत्नी समंथासुद्धा सहभागी झाली होती. या पार्टीचा व्हिडिओ समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
समंथा तिच्या आगामी तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ती नागा चैतन्यच्या वाढदिवस सेलिब्रेशनला पोहोचली.
https://twitter.com/anupamahere96/status/933593602864926720
Wishing a happy happy birthday to @chay_akkineni ji ..GodSpeed to #Savyasachi pic.twitter.com/3iqJhKUAyM
— vennela kishore (@vennelakishore) November 22, 2017
वाचा : ..जेव्हा मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स एकत्र येतात
सेटवर चित्रपटाच्या टीमसोबत केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. त्यासोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नागा चैतन्यच्या वाढदिवसाचं औचित्य साधत निर्मात्यांनी त्याच्या आगामी ‘सव्यसाची’ चित्रपटाचं मोशन पोस्टरही प्रदर्शित केलं.
Thank you @chandoomondeti @MythriOfficial for this one ! A glimpse into #Savyasachi pic.twitter.com/nKz45ze3v3
— chaitanya akkineni (@chay_akkineni) November 22, 2017