टॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ‘चैसम’ म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे काल संध्याकाळी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेल्या या ‘लव्ह बर्ड्स’ने हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले. या विवाहसोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहिले आहेत.

PHOTO : नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभूची मेहंदी सेरेमनी

गोव्यातील ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये समंथा आणि नागा चैतन्यच्या ‘बिग फॅट वेडिंग’चे आयोजन करण्यात आले आहे. नागा चैतन्यचे वडील आणि तेलगूतील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, लग्नात समंथाने नेसलेली साडी तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, ही साडी प्रसिद्ध निर्माते डी. रामानायडू यांची पत्नी डी. राजेश्वरी म्हणजेच नागा चैतन्यच्या आजीची आहे. या साडीला डिझायनर क्रेशा बजाजने हलकासा टच दिला आहे. चैतन्यनेही पांढऱ्या रंगाची सिल्क धोती आणि कुर्ता घातला.

वाचा : …म्हणून अभिषेकसोबत काम करण्यास प्रियांकाचा नकार

या विवाहसोहळ्याला डग्गुबती कुटुंब, व्यंकटेश, सुरेश बाबू यांनीही उपस्थिती लावली. तर इतर सेलिब्रिटी पाहुण्यांमध्ये अभिनेता राहुल रविंद्रन, वेन्नेला किशोर, सुशांत आणि अदिवी सेश यांचा समावेश आहे.

हिंदू विवाहपद्धतीनुसार शुक्रवारी लग्न झाल्यानंतर हे जोडपे शनिवारी ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न करतील. तर रविवारी हैदराबाद येथे या नवदाम्पत्याच्या आलिशान रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलेय.

https://www.instagram.com/p/BZ6PMilhGac/

Story img Loader