‘नागिन ३’ या मालिकेसह अन्य अनेक मालिकांमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता पर्ल वी पुरीसह मुंबई पोलिसांनी सह जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अभिनेता पर्लसह सर्व आरोपींना अटक केली आहे.
एका तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणीच्या आरोपांनुसार सर्व आरोपींनी आधी एका कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा तिचा विनयभंग करण्यात आला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने अभिनेता पर्लला (POSCO) ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पर्लसह पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.
View this post on Instagram
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्यासह सर्व आरोपींविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ४ जूनला रात्री पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.
करिश्मा तन्नासोबत अफेअर
अभिनेता पर्ल पुरी त्याच्या रिलेशलशिपमुळे कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत तो रिलेशशिपमध्ये असून दोघांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांमध्ये काही मतभेद निर्माण झाल्याने ते विभक्त झाले. असं असलं तरी करिश्मा आणि पर्ल सध्या चांगले मित्र आहेत.
या मालिकांमध्ये झळकला होता पर्ल वी पुरी
नागिन-३ सोबतच अभिनेता पर्ल अनेक शोमध्ये झळकला आहे. दिल की नजर से खूबसूरत, फिर भी ना माने बदतमीज दिल, मेरी सासू मां, बेपनाह प्यार और ब्रह्मराक्षस 2 या मालिकांमध्ये पर्लने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.