बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाक्री आणि तिचा कथित प्रियकर उदय चोप्रा यांच्या प्रेमाच्या चर्चा जेवढ्या रंगल्या तेवढ्याच चर्चा त्यांच्या ब्रेकअपच्याही झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण नुकतंच हे दोघं मालदीवला एकत्र फिरायला गेले होते. त्यामुळे या दोघांमधली भांडणं संपून दोघे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात रंगत होत्या. मात्र आता नर्गिसने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन उदयला अनफॉलो केल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये आता नेमका कशावरुन वाद झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एकीकडे नर्गिसने जरी उदयला अनफॉलो केलं असलं तरी उदय मात्र तिला इन्स्टाग्रामवर अजूनही फॉलो करत आहे. काही दिवसांपूर्वी उदय चोप्रा आणि नर्गिस फाकरी यांना विमानतळावर एकत्र प्रवास करताना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांनी फेर धरला. मात्र नर्गिसने या फक्त अफवाच आहे असं म्हणतं, माझ्यापेक्षा माझ्या लग्नाची सगळ्यांना फारच घाई झालेली दिसते अशा आशयाचं ट्वीट केलं होतं.

https://www.instagram.com/p/BZSLJQPhzy8/

गेल्या वर्षी नर्गिसची मानसिक अवस्था बरी नसल्याचंही म्हटलं जात होतं. नर्गिसला उदयशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र उदयने तिची मागणी धुडकावल्याने तिला मानसिक त्रास झाला होता. नैराश्यात गेलेली नर्गिस ‘बँजो’ या चित्रपटाचं शूटिंग अर्धवट सोडून काही दिवसांसाठी न्यूयॉर्कला गेली होती.

https://www.instagram.com/p/BX23Sjfh9dV/

View this post on Instagram

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Uday Chopra (@udayc)