काही दिवसांपूर्वीच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं चरित्रात्मक पुस्तक ‘अॅन ऑर्डीनरी लाइफ’ प्रकाशित करण्यात आलं आणि आता त्यावरून निर्माण झालेल्या वादांनंतर नवाजने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील माहिती दिली.

नवाजच्या या पुस्तकात त्याने आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. पूर्वाश्रमीची प्रेयसी सुनीता राजवार, अभिनेत्री आणि सहकलाकार निहारिका सिंगसोबतचं अफेअर यांविषयी त्याने लिहिलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींनी यावर आक्षेप घेत नवाजवर सडेतोड टीकादेखील केली होती. त्यामुळे चरित्राच्या अनावरणापासूनच पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

नवाजने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘माझ्या चरित्रात्मक पुस्तकामुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’

२०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीनचे शारीरिक संबंध होते, असं या पुस्तकात लिहिलं आहे. जवळपास एक वर्ष निहारिकासोबत अफेअर असल्याचं त्याने त्यात स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे काही महिन्यांच्या अफेअरनंतर त्याच्या वाईट स्वभावामुळे ब्रेकअप केल्याचं निहारिकाने म्हटलं. नवाजुद्दीन त्याच्या पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी आपण एका महिलेचं शोषण केले होते, हे सांगून तिचा अपमान करत आहे, असं मत मांडत अभिनेत्री निहारिका सिंगने त्याच्यावर टीकासुद्धा केली होती.

वाचा : निहारिकामुळे नवाजुद्दीन कायद्याच्या कचाट्यात?

दुसरीकडे अभिनेत्री सुनीता राजवारने फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून तिची बाजू सर्वांसमोर मांडली. सुनीताने नवाजवर खोटं बोलल्याचा आरोप फेसबुक पोस्टमध्ये केलाय. ‘तू गरीब होतास म्हणून नाही तर तुझ्या गरीब विचारांमुळे मी तुला सोडलं. तुला महिलांचा आदर करता येत नाही,’ अशा शब्दांत सुनीताने नवाजवर टीका केली होती.