‘माझ्या मते बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता मी आहे,’ असं अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो. ‘इंडिया टीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात नवाजुद्दीनने त्याचं मत मांडलं. भूमिका कितीही क्लिष्ट असली तरी ती पडद्यासमोर सहजपणे मांडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘अभिनयाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास माझ्या मते चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक मानधन मला मिळतं. मला विचारावं लागत नाही. चित्रपट निर्माते स्वत:हून मला तेवढं मानधन देऊ लागले,’ असंही तो म्हणतो.

सध्या बॉलिवूडच्या बहुतांश कलाकारांना हॉलिवूडचे वेध लागले आहेत. याबद्दलही नवाजने त्याचं मत मांडलं. ‘आपल्यात न्यूनगंड का आहे हेच मला समजत नाही. इथं प्रत्येकाला हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. जेव्हा आपण अधिक प्रगत देशाचे चित्रपट पाहतो तेव्हा कुठेतरी आपल्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्यांची पातळी आपण गाठू शकणार नाही असं आपल्याला वाटू लागतं. पण बॉलिवूड चित्रपटांबद्दलही आपल्याला अभिमान वाटलं पाहिजे. आपल्या चित्रपटांचं कथानक तितकंच दमदार आहे,’ असं तो म्हणतो.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

वाचा : …म्हणून ‘देसी गर्ल’ची झोप उडाली

नवाजुद्दीनचा आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. कुशन नंदी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री बिदिता बागचीही महत्त्वाची भूमिका आहे.