बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सतत चर्चेत असता. त्या मुलगी मसाबा सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाचे नाव ‘सच कहूं तो’ असे आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.
नीना गुप्ता यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलगी मसाबाच्या आयुष्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. मसाबा गुप्ताने निर्माता मधु मंटेनाशी लग्न केले होते. पण काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांना विचारण्यात आले होते की मसाबाने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता नीना यांनी म्हटले, ‘तिने कोणताही निर्णय घेतला तरी मी तिच्यासोबत असेन.’
आणखी वाचा : ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला होता वाद
View this post on Instagram
पुढे त्या म्हणाल्या, ‘ती आता ३० वर्षांची आहे. ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. ती स्वत:साठी जो काही निर्णय घेईल त्यासाठी माझा तिला पाठिंबा असेल. मी कायम तिच्यासोबत आहे. जेव्हा आम्ही मधुला भेटलो तेव्हा तो ठिक वाटला होता. पण मसाबा आणि त्याचे नाते फार काळ टिकले नाही. माझे त्याच्याशी कामा संदर्भात बोलणे होत असते.’