अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेदेखील कामय चर्चेत राहतात. नीना गुप्ता यांच्या नुकत्याच आलेल्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. या पुस्तकामुळे नीना गुप्ता चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी त्यांच्या कामाबद्दल तसचं खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केलाय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या फिल्मी करिअरबद्दल काही गोष्टींचा खुलासा केलाय. पैसे नसल्याने अनेक सिनेमांमध्ये वाईट भूमिका देखिल केल्या असल्याचं नीना गुप्ता म्हणाल्या. नीना गुप्ता म्हणाल्या, “मी काही सिनेमांमध्ये असं काम केलंय जे मला कधीच आवडलं नाही. मला पैश्यांची गरज असल्याने मी अनेक खालच्या दर्जाच्या सिनेमांमध्ये काम करायचे. या सिनेमांमध्ये काम करून झाल्यानंतर मी नेहमी प्रार्थना करायेच की हे सिनेमा कधीच रिलीज होवू नये. तसचं माझ्याकडे जेव्हा काम नव्हत तेव्हा मी काही वाईट भूमिकादेखील साकारल्या आहेत.” असं म्हणत पुन्हा एकदा नीना गुप्ता यांनी त्यांच्या करिअरविषयी मोकळेपणाने भाष्य़ केलंय.

हे देखील वाचा: Raj Kundra case: ‘त्या’ पोस्टनंतर शिल्पा शेट्टीला वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिससह बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

पुढे नीना गुप्ता म्हणाल्या, ” तुम्ही विचारदेखील करू शकत नाही असे खालच्या दर्जाचे सिनेमे मी केले आहेत. त्यातील एक सिनेमा टीव्हीवर सारखा सारखा येतो. जेव्हा मी स्वत:ला त्या सिनेमात पाहते तेव्हा माझं डोकं फिरतं. आता मात्र परिस्थिती बलदलली आहे. आता माझ्यावर जबाबदारी आहे. मला कोणती भूमिका साकारायची आणि कोणती नाही याबातीत आता माझे विचार स्पष्ट आहेत.” असं त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता यांनी ‘ये नजदीकियां’, ‘मंडी’, ‘उत्सव’, ‘डैडी’, ‘खलनायक’, ‘तेरे संग’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलंय.