बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून त्याचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ मुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. १४ जूनला हे आत्मचरित्र प्रकाशित झालंय. त्यानंतर नीना गुप्ता यांनी गुलजार यांची भेट घेत त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलं. यावेळी नीना गुप्ता यांनी परिधान केलेल्या शॉर्टस् मुळे त्यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. या ट्रोलर्सना नीना गुप्ता यांनी आता सडेतोड उत्तर दिलंय.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुलजार यांच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअऱ केला होता. या व्हिडीओत नीना गुप्ता गुलजार यांना पुस्तक भेट म्हणून देताना दिसत आहेत. याच वेळी नीना गुप्ता यांनी गुलजार यांना ‘पुस्तक वाचाल ना’ असा प्रश्नही विचारला आहे. तर कॅप्शनमध्ये त्या म्हणाल्या, “खूप आनंदी आहे आणि थोडी चिंतेतही की त्यांना माझं पुस्तक आवडेल की नाही.” असं त्या म्हणाल्या. मात्र गुलजार यांच्या भेटीला नीना गुप्ता शॉर्टस् परिधान करुन गेल्याने त्या काही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या.

आणखी वाचा: “साडी नेसून जायला हवं होतं”, गुलजार यांच्या भेटीला गेलेल्या नीना गुप्ता शॉर्ट्समुळे झाल्या ट्रोल

यावर ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. त्या म्हणाल्या, “जेव्हा मला ट्रोल केलं गेलं असं म्हंटलं जातं तेव्हा ट्रोलिंगची नेमकी परिभाषा काय समजावी? याचा अर्थ असा नाही की अनेकजण तुमची टीका करत आहेत. तुम्ही पहा अनेक जणांकडून माझं कौतुक करण्यात आलंय. त्यामुळे मी या २-४ लोकांची काळजी करणं गरजेचं आहे का?” असं त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: ‘बिग बॉस-१५’मध्ये अंकिता लोखंडे सहभागी होणार?; स्वत: अंकिताने दिली प्रतिक्रिया म्हणाली…

पुढे नीना गुप्ता यांनी ट्रोलर्सना काही सांगायचं आहे का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्य़ा, “कशाला? माझं कौतुक करणारे बरेच लोक असताना मी या २-४ लोकांना का महत्व देऊ” असं त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता यांनी त्यांचा ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. लग्न न करताच आई होणं ते मुलीचा सांभाळ करणं. तसचं आयुष्यात आलेला एकाकीपणा आणि त्यावर केलेली मात अशा अनेक खासगी गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात भाष्य केलंय. या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Story img Loader