बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता या गेल्या काही दिवसांपासून त्याचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’ मुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. १४ जूनला हे आत्मचरित्र प्रकाशित झालंय. त्यानंतर नीना गुप्ता यांनी आज गुलजार यांची भेट घेत त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलंय.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुलजार यांच्या भेटीचा एक व्हिडीओ शेअऱ केलाय. या व्हिडीओत नीना गुप्ता गुलजार यांना पुस्तक भेट म्हणून देताना दिसत आहेत. याच वेळी नीना गुप्ता यांनी गुलजार यांना ‘पुस्तक वाचाल ना’ असा प्रश्नही विचारला आहे. तर कॅप्शनमध्ये त्या म्हणाल्या, “खूप आनंदी आहे आणि थोडी चिंतेतही की त्यांना माझं पुस्तक आवडेल की नाही.” असं त्या म्हणाल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे देखील वाचा: करीना कपूरचा ड्रेस पाहून भडकला होता सैफ अली खान, म्हणला “आधी ते कपडे…”

या व्हिडीओत नीना गुप्ता यांनी निळ्या रंगाची शॉर्टस् आणि शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी नीना गुप्ता यांचं कौतुक केलंय. त्यांचं आत्मचरित्र वाचण्यासाठी उत्सुक असल्याचं काही म्हणाले आहेत. तर अनेकांना नीना गुप्ता यांचा लूक आवडला आहे. असं असलं तरी काही नेटकऱ्यांनी मात्र त्यांच्या या लूकवर टीका करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. एक युजर म्हणाला, “गुलजार साहेबांकडे जाताना तुम्ही साडी परिधान करून जायला हवं होतं. कारण गुलजार साहेब हे गुलजार साहेब आहेत शेवटी.”

neena-gupta-troll
(Photo-Instagram@neena-gupta)

हे देखील वाचा: देसी गर्ल प्रियांका चोप्राने देसी पदार्थांवर मारला ताव; अमेरिकेत खातेय ब्रेड पकोडे आणि डोसा

तर दुसरा युजर म्हणाला, “वयाच्या हिशोबाने चला मॅम” दरम्यान काही युजर्सनी नीना गुप्ता यांना ट्रोल केलं असलं तरी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी मात्र त्यांना पसंती दिलीय. अभिनेता अनिल कपूरने देखील कमेंट करत नीना गुप्ता यांचं पुस्तक वाचण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे.

नीना गुप्ता यांनी त्यांचा ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. लग्न न करताच आई होणं ते मुलीचा सांभाळ करणं. तसचं आयुष्यात आलेला एकाकीपणा आणि त्यावर केलेली मात अशा अनेक खासगी गोष्टींवर त्यांनी या पुस्तकात भाष्य केलंय.

Story img Loader