छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपति १३’ या शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते. या शोमध्ये ‘शानदार शुक्रवार’ असा एक एपिसोड असतो. या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी टोक्यो ऑल्मिपिकमध्ये भारतासाठी पदक मिळवत आपल्या देशाचे नाव उंच करणाऱ्या खेळाडूंनी हजेरी लावली आहे. त्यात भारताचा गोल्डन बॉय आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेश यांनी हजेरी लावली आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आजच्या या एपिसोडचा प्रोमो सोनी टिव्हिच्या अधिकृत अकाऊटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नीरज अमिताभ यांना भाला फेकण्याची पद्धत सांगतो आणि म्हणतो ‘मी तुम्हाला भालाफेकून दाखवलं असतं पण…,’तेवढ्यात अमिताभ हसत हसत म्हणतात ‘नको नको.’ यानंतर अमिताभ श्रीजेशला विचारतात ‘गोल कसा सेव्ह करतात ते दाखवू शकतात का?’ त्यानंतर अमिताभ गोल करण्याचा प्रयत्न करतात आणि तिसऱ्यांदा ते गोल करतात. हा एपिसोड आज प्रदर्शित होणार आहे.

हा प्रोमो नीरजने ही शेअर केला आहे. नीरजने ट्वीटरवर हा प्रोमो शेअर करत ‘आज रात्री ९ वाजता ‘केबीसी १३’च्या शानदार शुक्रवारमध्ये श्रीजेश भाऊ आणि मला अमिताभ बच्चन सर यांच्यासोबत आमचं जनरल नॉलेज तपासताना पाहा..,’असे कॅप्शन दिले आहे. यासोबतच नीरज आणि श्रीजेशने त्यांना खेळामध्ये करिअर करताना किती अडचणी आल्या ते सांगितले आहे.

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नीरज अमिताभ यांना हरियाणवी शिकवतो. नीरज सुरुवातीला अमिताभ यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातील ‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं।’ या डायलॉगला हरियाणवीत बोलतो ‘ये तेरे बाप का घर कोणी, थाणा है, चुपचाप खड़ा रह।’ अमिताभ या डायलॉगला खूप चांगल्या पद्धतीत बोलतात. यानंतर नीरज ‘मैं आज भी फेंके हुए पैसे ना ठाता।’ हा डायलॉग बोलतो, नीरजची हरियाणवी ऐकूण अमिताभ चक्करावतात आणि त्याला पुन्हा एकदा बोलायला सांगतात. शेवटी तीनवेळा नीरजने हा डायलॉग बोलल्यानंतर ते हा डायलॉग बोलतात. पुढे अमिताभ, ‘मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं कि अगर तुम होती तो ऐसा होता औत तुम होती तो वैसा होता.’ हा त्यांचा आवडता डायलॉग नीरजला हरियाणवीत बोलायला सांगत त्याची परिक्षा घेतात. नीरज पटकन हा डायलॉग बोलतो आणि सगळे प्रेक्षक हसू लागतात.

आणखी वाचा : ‘तिच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे की…’, बोल्ड ड्रेसने फजिती केल्यानंतर नोरा फतेही झाली ट्रोल

हा एपिसोड आज १७ सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नीरज आणि पीआर श्रीजेश अमिताभ यांच्याशी मस्ती करत प्रश्नांची उत्तर देताना दिसतात. या आधी शानदार शुक्रवारमध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने हजेरी लावली होती. तर गणेशोत्सव आणि शानदार शुक्रवारच्या निमित्ताने दीपिका पादूकोण आणि फराह खानने हजेरी लावली होती.

 

Story img Loader