अभिनेत्री नेहा धुपिया सध्या छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. तिच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून शोच्या प्रमोशनसाठी ती चंदिगड येथे पोहोचली. प्रमोशननंतर चंदिगडहून परतताना नेहाच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र धक्कादायक म्हणजे, तेथे लोकांनी तिची मदत न करता सेल्फी काढला. काहींनी तर चक्क तिला ऑटोग्राफचीही मागणी केली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.

मुंबईला परतण्यासाठी नेहा चंदीगड विमानतळाकडे जात होती. मात्र मध्येच तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळे एक तासाहूनही अधिक वेळ नेहाला अपघातस्थळीच अडकून राहावं लागलं होतं.

वाचा : ‘जब हॅरी मेट सेजल’ची स्तुती केल्याने पाकिस्तानी कलाकार झाले ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदैवाने नेहा आणि तिच्यासोबत कारमध्ये असणाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नाही. नेहाच्या खांद्याला किरकोळ जखम झाल्याची माहिती मिळतेय. अपघातानंतर तेथील लोकांचं वागणं तिच्यासाठी धक्कादायक होतं. तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोकांनी तेथे गर्दी केली होती. हा सर्व प्रकार संतापजनक असल्याने याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत.