बॉलिवूड गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणता ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे ती चर्चेत असते तर कधी इंडियन आयडलमधील स्पर्धकांना दिलेल्या भेट वस्तूंमुळे ती चर्चेत असते. पण सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर तिच्या लग्नाची तयारी सुरु असल्यामुळे ती चर्चेत आहे. नेहाच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडलच्या पुढच्या भागाचा प्रमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणचे वडिल उदित नारायण आणि त्यांची पत्नी दीपाने शोमध्ये हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान उदित नारायण आणि आदित्य नेहाची मस्करी करताना दिसत आहेत. 'मी हा शो पहिल्या दिवसापासून पाहिला आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे शोमधील सर्वच स्पर्धक टॅलेंटेड आहेत आणि दुसरं म्हणजे नेहा कक्करला सून म्हणून घरी आणण्याचा विचार करत आहे' असे उदित नारायण म्हणाले. Taareekh teh ho chuki hai, Mummy-Papa ne bhi apni haan de di hai! Kya Aditya finally Neha ko apni dulhan banaane mein kaamiyaab hoga? Dekhiye #IndianIdol11 #AlkajiUditjiSpecial mein, iss Sunday raat 8 baje. #AlkaYagnik #UditNarayan #AdityaNarayan @iAmNehaKakkar @VishalDadlani pic.twitter.com/odf47CSwMH — Sony TV (@SonyTV) January 9, 2020 त्यानंतर आदित्यची आई दीपा नारायण यांनी देखील नेहाला सून म्हणून घरी आणण्याचा विचार केला असल्याचे म्हटले. आम्हाला नेहा फार आवडते असे देखील त्या म्हणाल्या आहेत. इतकच नव्हे तर नेहाच्या आई-बाबांना देखील शोमध्ये बोलवण्यात आले आहे. त्यांनीही आदित्य आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिल्याचे दिसत आहे. हा एपिसोड लवकरच प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ शोचा एक भाग असू शकतो. कारण शोमध्ये आदित्य सतत नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो.