आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचं अलिकडेच लग्न झालं. रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर रोजी नेहाने लग्नगाठ बांधली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत. मात्र, सध्या नेहाविषयी एक नवीनच चर्चा रंगली आहे. नेहा लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासोबतच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये चर्चाही होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नेहाने अलिकडेच तिचा आणि रोहनप्रीतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत.


नेहाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे.

आणखी वाचा- …म्हणून नेहाने प्रपोज केल्यानंतर रोहनने दिला होता लग्नाला नकार

दरम्यान, नेहाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर दुसरीकडे नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती अशी चर्चा रंगली आहे. नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने पूर्ण होत आहेत.