बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका नेहा कक्करने काही दिवसांपूर्वी रोहनप्रीत सिंहशी लग्न केले. रोहन देखील गायक आहे. ते दोघेही सतत एकत्र वेळ घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच नेहाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे भांडताना दिसत आहेत. पण खरच त्यांच्यामध्ये भांडण झाले आहे की नेहा आगामी गाण्याचे प्रमोशन करत आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर रोहन प्रीत सिंहसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे ही रस्त्याच्या मध्ये उभे असून भांडताना दिसत आहेत. दरम्यान नेहा रोहनच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. नेहा आणि रोहन यांच्यामध्ये कोणतेही भांडण झालेले नसून ते दोघेही ‘खढ तैनू मैं दसा’ या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
नेहाच्या या पोस्टवर कमेंट करत रोहन सर्वांचे वेधून घेतले आहे. नेहा आणि रोहनचे ‘खढ तैनू मैं दसा’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी नेहाने असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये रोहन नेहाला मस्करीमध्ये मारताना दिसत होता आणि नेहाला रोहनचा प्रचंड राग येतो. रागाच्या भरात नेहा रोहनला मारताना दिसत होती. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये गाणे ऐकू येत होते. तेव्हा देखील नेहा ‘खढ तैनू मैं दसा’ या गाण्याचे प्रमोशन करताना दिसत होती.
