बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या सहकलाकाराची धुलाई करताना दिसत आहे.

अवश्य पाहा – ‘या’ श्रीमंत अभिनेत्रीसमोर शाहरुख खानही वाटतो गरीब

अवश्य पाहा – जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री

@nehakakkarOur Very First TikTok on our #GoaBeach Song! tonykakkar #Sorry Bhaiyuuuu #TiktokIndia #TonyKakkar #NehaKakkar♬ Goa Beach Tony Kakkar Neha Kakkar – Neha Kakkar

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसी नाईकच्या अदा पाहून व्हाल फिदा

अवश्य पाहा – Oscar 2020 : भारतीय चित्रपटांना ऑस्करपर्यंत नेणारे ‘मराठी’ दिग्दर्शक

नेहाने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या टिक-टॉक व्हिडीओमध्ये तिचा भाऊ टोनी आणि ती गोवा बिच या गाण्यावर डान्स करत आहेत. तेवढ्यात टोनी तिचे केस खेचतो आणि ती त्याला एक चपराक लगावते. अर्थात हा व्हिडीओ तिने गंमत म्हणून अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी नेहा तिच्या ‘पूछदा ही नहीं’ (Puchda Hi Nahin) या गाण्यामुळे चर्चेत होती. हे गाणे प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. आतापर्यंत ८७ लाखांपेक्षा अधिक वेळा हे गाणे युट्यूबवर पाहिले गेले आहे.