‘बिग बॉस मराठी २’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते झाले आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नेहा शितोळेला या रिअॅलिटी शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा वावर आणि तिच्या स्ट्रॅटेजीस पाहता, घराबाहेर तिचे लाखो चाहते झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिच्या एका डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नेहा साडी नेसून ‘मुंगळा’ गाण्यावर ठुमके लावताना दिसून येत आहे.
विकेंडच्या डावात नेहा पारंपरिक वेशात पाहायला मिळत असून पिवळी साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून येत आहे. महेश मांजरेकरांच्या आग्रहानंतर नेहाने घरातील इतर स्पर्धकांसमोर ‘मुंगळा’ गाण्यावर डान्स सादर केला. तिच्या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स मिळत आहे.
View this post on Instagram