‘नेटफ्लिक्स’ हे ऑनलाईन स्ट्रिमिंग क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप म्हणून ओळखले जाते. जवळपास १५८.३ दशलक्ष सबस्क्राइबर्स असलेले ‘नेटफ्लिक्स’ ऑनलाईन मालिका आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी पहिल्या पसंतीचे अ‍ॅप म्हणून ओळखले जाते. परंतु ऑनलाईन मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या या मक्तेदारीला छेद देण्यासाठी आता आणखी एक स्ट्रिमिंग अ‍ॅप बाजारात उतरले आहे. द वॉल्ड डिस्ने कंपनीने सुरु केलेल्या या अ‍ॅपचे नाव ‘डिस्ने प्लस’ असे आहे.

Flashback 2019: जगभरात सर्वाधिक वेळा पाहिले गेलेले २० फोटो

‘डिस्ने प्लस’ सुरु होताच त्यांनी नेटफ्लिक्सला धक्का देण्यास सुरुवात केली. पहिल्याच महिन्यात नेटफ्लिक्सचे तब्बल १.१ दशलक्ष (१ कोटी १० लाख) प्रेक्षक डिस्नेने आपल्या दिशेने खेचले. या मंडळींनी नेटफ्लिक्स अ‍ॅप बंद करुन आता डिस्ने पाहण्यास सुरुवात केली आहे. न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार डिस्नेकडे सध्या १५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. येत्या एक महिन्यात नेटफ्लिक्स पाहणारे आणखी २४ दशलक्ष ( २ कोटी ४० लाख ) प्रेक्षक डिस्ने प्लसच्या दिशेने वळणार आहेत. हा सर्व प्रकार सध्या अमेरिकेत सुरु आहे.

सलमानमुळं अभिनेत्रीला बदलावं लागलं नाव

द वॉल्ट डिस्ने ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. डिस्नेचे शेकडो ऑनलाईन शो याआधी नेटफ्लिक्सवर सुरु होते. परंतु आता त्यांनी स्वत:चे स्ट्रिमिंग अ‍ॅप सुरु केल्यामुळे ते सर्व शो त्यांनी स्वत:च्या अ‍ॅपवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. सर्वेनुसार नेटफ्लिक्सच्या एकूण प्रेक्षकांपैकी २४ टक्के प्रेक्षक डिस्नेचे शो पाहाणारा आहे. त्यामुळेच हा प्रेक्षक आता नेटफ्लिक्सपासून दुरावला आहे. येत्या काळात आणखी ६० दशलक्ष प्रेक्षक त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.