‘स्नॅपचॅट’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ अशा अनेक ठिकाणी सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांजच्या चाहत्यांचा आकडा अतिशय वेगाने वाढत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दिलजीने एका पोलिसाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच दिलजीतने हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. सध्या दिलजीतच्या काही फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या फोटोंमध्ये दिलजीत पगडीविना दिसत आहे. इतकेच नाही तर तो एका नवीन हेअर स्टाईलमध्ये दिसत आहे.

दिलजीतचे व्हायरल झालेले हे फोटो पाहून त्याचे चाहते मात्र नक्कीच आश्चर्यचकीत झाले आहेत. आतापर्यंत त्याला नेहमीच पगडीमध्येच पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या नवीन हेअरस्टाईलमध्ये दिलजीत हटके अंदाजात दिसून येत आहे. दिलजीत आपल्या आगामी ‘सुपर सिंग’ या चित्रपटात एका सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनम बाजवासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. अभिनय आणि गायन या दोन्ही गोष्टींसाठी दिलजीत पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे.

छाया सौजन्य : फिल्मी मंकी

259881_212685532107929_6194

563120_1398942687026166_246

1545741_1398942830359485_56

1175435_183812285133039_178

VIDEO : …म्हणून या गाण्यात सलमान चक्क रडला

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने यापूर्वी ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. दिलजीतच्या चित्रपटांप्रमाणेच त्याची गाणीही चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तेव्हा बॉलीवूडला गवसलेला हा नवीन ‘पंजाबी नायक’ बी टाउनमध्ये स्वत:ची जागा बनवण्यात नक्किच यशस्वी झाला आहे.