एक वेगळा विषय घेऊन ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘छत्रीवाली’. नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा…ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम.

योगायोगाने विक्रमच्याच ऑफिसमध्ये मधुराणीला जॉबची ऑफर मिळते. आपल्या तालावर मधुराणीला नाचवू पाहणा-या विक्रमला मधुराणी शरण जाते की त्यालाच सरळ करते? नात्याच्या छत्रीखाली या दोघांचं नातं बहरतं का अश्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर छत्रीवाली ही मालिका पाहायलाच हवी.

वाचा : नितीन गडकरींनी घेतली नाना पाटेकरांची भेट

मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. संकेत पाठकनं या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. १८ जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर ‘छत्रीवाली’ मालिका प्रसारित होणार आहे.