लग्नाआधी आई वडिलांची लाडाची लेक लग्न झाल्यावर सासरची सून होते पण लाडाची लेक राहत नाही असं म्हटलं जातं. माहेरचे दरवाजे आजकाल लग्नानंतरही उघडे असतात पण मुलगी मात्र परक्याचं धन म्हणून संबोधली जाते. बापाची लाडाची लेक आणि मुलीवर जीवापाड प्रेम करणारा बाप लग्नानंतरही सावली सारखा आणि देवासारखा उभा राहिला तर.. अशीच एक गोष्ट झी मराठी वाहिनीवरच्या नव्या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेत प्रेक्षकांना कस्तुरीचा प्रेमसंघर्ष अनुभवता येईल. या मालिकेत प्रेमात संघर्ष नाही तर प्रेम आणि संघर्ष दोन्ही आहेत. या मालिकेत मिताली मयेकर, आरोह वेलणकर, स्मिता तांबे आणि उमेश जगताप असे तगडे कलाकार असणार आहेत. कस्तुरी आणि सौरभची प्रेमकथा यात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

१४ सप्टेंबर पासून ही नवी मालिका संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर सुरू होणार आहे.